PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 16, 2024   

PostImage

मायक्रोसॉफ्ट' बनली जगातील नंबर 1 कंपनी 'अॅपल'ला पछाडले,मायक्रोसॉफ्ट' बनली जगातील …


 

वॉशिंग्टन (ए). टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट अॅपल कंपनीला पिछाडीवर टाकत जगातील नंबर एक कंपनी बनली आहे. 11 जानेवारी रोजी कंपनीचे बाजार भांडवल हे अॅपलपेक्षा अधिक झाले. या दिवशी कंपनीचे शेअर्स 1.6 टक्क्यांनी वाढले. यामुळे कंपनीचे बाजार मूल्य तब्बल 2,875 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले. याचवेळी अॅपलचे शेअरर्स 0.9 टक्क्यांनी घसरले. त्यामुळे कंपनीचे बाजारमुल्य 2,871 ट्रिलियनवर आले. यावर्षी सुरुवातीच्या आठ दिवसांपासूनच अॅपलचे शेअर्स घसरण अनुभवत आहेत. आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (एआय) आता मायक्रोसॉफ्टसाठी वरदान ठरत असल्याचे दिसते आहे. यामुळेच गुंतवणूकदार कंपनीला पसंत करत आहेत. 2021 नंतर प्रथमच अॅपलच्या शेअर्सचे मूल्यांकन मायक्रोसॉफ्टपेक्षा कमी झाले आहे. जानेवारी 2024 मध्ये गुरुवारपर्यंत अॅपलचे शेअर्स 3.3 टक्क्यांनी घसरले होते, तर मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये 1.8 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले.